मावळ ऑनलाईन –हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे आयोजित भंडारा डोंगर चढणे (रनिंग) स्पर्धा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता भंडारा डोंगर पायथा, सुदवडी येथे होणार आहे. ही स्पर्धा अॅड. रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली असून तिन्ही वयोगटांत शंभरहून अधिक स्पर्धकांची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे.
Vadgaon Maval : वडगांवच्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डीपीला ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध
ही स्पर्धा इ. ५ वी ते ७ वी, इ. ८ वी ते १० वी (मुले-मुली) आणि खुला गट – महिला व पुरुष अशा तिन्ही गटांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹ २,०००/- तर द्वितीय ₹ १,५००/-, तृतीय ₹ ७५०/- आणि उत्तेजनार्थ ₹ ५००/- अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येईल.
ही स्पर्धा कै. रोहित रविंद्रनाथ दाभाडे प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने घेण्यात येणार असून उद्घाटन दीपक फल्ले (असिस्टंट गर्व्हनर, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१) यांच्या हस्ते होईल. यावेळी पै. तानाजी काळोखे (महाराष्ट्र चॅम्पियन), जोपाशेठ पवार (सेक्रेटरी, भंडारा डोंगर ट्रस्ट), मंगल गाडे (सरपंच, सुदुंबरे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजेपर्यंत हिंदविजय पतसंस्था कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इ. ५ वी ते १० वी वयोगटातील स्पर्धकांनी पालक किंवा शाळेच्या शिक्षकांसोबत स्पर्धेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धा संपर्क :
दत्तात्रय कांदळकर – ८८०५८०७८५८
राजेंद्र लांडगे – ८३०८३६४६०९
दीपक दाभाडे – ९६०४७८८८१८
सचिन आरते – ९९२१६८८९८८
या अनोख्या डोंगर चढाई स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.