मावळ ऑनलाईन – ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयातून १९५२ साली शिक्षण घेतलेले आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवलेले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुधीर भाटे यांनी शाळेला सदिच्छा भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबत मंदाताई बवरे, लताताई कवळेकर, प्रसाद कवळेकर आणि अंजली लोखंडे या माजी विद्यार्थ्यांनीही भेट (Talegaon) दिली.
या भेटीप्रसंगी नूतन मराठी विद्यालय प्रतिष्ठान मंडळाचे सचिव संतोष खांडगे, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी (Talegaon) आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या परिसरात प्रवेश करताच माजी विद्यार्थी जुन्या आठवणींमध्ये हरवले. शाळेतील डिजिटल वर्ग, समृद्ध ग्रंथालय आणि सुधारित शैक्षणिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा शाल, रोप आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. भाटे यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे, मैत्रीचे नाते जपण्याचे आणि शिक्षकांप्रती आदर ठेवण्याचे आवाहन केले. लता कवळेकर यांनी शाळेच्या आठवणींवर आधारित कविता सादर केली, तर मंदाताई बवरे यांनी आपल्या शालेय काळातील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.
संतोष खांडगे यांनी शाळेला मिळालेला शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा, सातत्याने मिळणारे पुरस्कार आणि शाळेच्या प्रगतीचा आलेख याचे कौतुक करत माजी विद्यार्थ्यांचे (Talegaon) स्वागत केले.

या भेटीच्या निमित्ताने डॉ. सुधीर भाटे यांनी शाळेला २५ हजार रुपयांची, लता आणि प्रसाद कवळेकर यांनी ११ हजार रुपयांची तर अंजली लोखंडे यांनी ५ हजार रुपयांची देणगी दिली. याशिवाय मंदाताई बवरे यांनी शालेय ग्रंथालयासाठी दर्जेदार आणि अभ्यासोपयोगी पुस्तके भेट दिली.
Vadgaon Maval : वडगांवच्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डीपीला ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध
माजी विद्यार्थ्यांनी दिलेली देणगी ही शाळेबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचे, आपुलकीचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. त्यांचा हा आदर्श भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती बारमुख यांनी केले.
“शाळा ही केवळ शिक्षणसंस्था नसून संस्कारांचे गुरुकुल आहे,” हे या भेटीद्वारे पुन्हा (Talegaon) अधोरेखित झाले.