मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष.तिथी – २. शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – २७.०६.२०२५. (Rashi Bhavishya 27 June 2025) शुभाशुभ विचार – शुभ दिवस.आज विशेष – सामान्य दिवसराहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.दिशा शूल – पश्चिमेस असेल.आज नक्षत्र – पुनर्वसू ०७.२२ पर्यंत नंतर पुष्य.चंद्र राशी – कर्क.
—————————-
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 27 June 2025
आज तुमचा कामावर दांडी मारायचा मूड असेल. काही घरगुती कामात अर्जंट लक्ष घालावे लागेल. कलाकारांना तर प्रचंड स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. आज सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मानसन्मान वाढेल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरीही आज पैशाची कमतरता भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी आज रुसून बसतील.
कर्क ( शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा तुमचा हट्ट असेल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचेही म्हणणे समजून घ्या.
MP Shrirang Barne : हिंजवडीसह सात गावे महापालिकेत घेण्याची हीच योग्य वेळ
सिंह ( शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 27 June 2025
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळावी.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.
तूळ (शुभ रंग- मरून)
राशीच्या कर्मस्थानी चंद्र भ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांना अजिबात वेळ नसतो. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहता येईल.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ नक्की मिळेल.
Talwade Murder : अनैतिक संबंधातून दुहेरी खून, आरोपीला अटक
धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 27 June 2025
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होऊ शकते. वैवाहिक जीवनात आज माझ चुकलं ही भूमिका हिताची राहील.
मकर (शुभ रंग- क्रीम)
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबलात तरी आज वरिष्ठांचे समाधान होणे शक्य नाही. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीला प्राधान्य देणे गरजेचे.
मीन ( शुभ रंग – पिस्ता)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नव्या संधी येतील. काही जण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हौस मौज करण्यास प्राधान्य देतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424