मावळ ऑनलाईन – रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी सुरक्षा पट्टीला एका भरधाव दुचाकीची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. हा अपघात ३० मी रोजी घडला असून याप्रकरणी २४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात( Dehuroad Crime News )आला आहे.
प्रशांत बसवराज रेड्डी (२४) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी रेवणसिद्ध शिवराज रेड्डी (२७, मोशी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर हुल्लेप्पा गुंगे (३०, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवणसिद्ध यांचा चुलत भाऊ प्रशांत रेड्डी हा त्याचा मित्र अमर गुंगे याच्या दुचाकीवरून जात होता. देहूरोड येथून निगडीच्या दिशेने येत असताना जकात नाक्याजवळ दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी सुरक्षा पट्टीला धडक बसली. या अपघातात प्रशांत रेड्डी यांचा मृत्यू झाला ( Dehuroad Crime News )आहे.