मावळ ऑनलाईन –नियमित सूर्यनमस्कार घालण्याने आपले शरीर सुदृढ राहते व शरीर निरोगी राहते यासाठी नियमित सूर्यनमस्कार व योग करावे असे प्रतिपादन गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले.
स्माईल व्यसनमुक्ती केंद्र रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांसाठी अकराशे सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संतोष परदेशी बोलत होते.
Pune: पुण्यात शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून निशाणा
स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आतील 124 रुग्ण व गोल्डन रोटरी चे सदस्य यांनी मिळून आज अकराशे सूर्यनमस्कार घालून एक वेगळा अनोखा उपक्रम योग दिनानिमित्त केला.

याप्रसंगी स्माईल चे संस्थापक हर्षल पंडित,सहप्रांतपाल दीपक फल्ले,प्रशांत ताये,प्रदीप टेकवडे,दिनेश चिखले,राकेश गरुड,बसप्पा भंडारी हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल बोरुडे,स्माईल मधील योगा टीचर अक्षय संडिम,हर्षल जोशी, रोहन यादव, नितीन नाटेकर,आनंद भागवत यांनी 1100 सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.