मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – ज्येष्ठ – कृष्णपक्ष. तिथी – १२. शके १९४७. वार – रविवार. तारीख – २२.०६.२०२५.(Rashi Bhavishya 22 June 202)
शुभाशुभ विचार – १८ पर्यंत चांगला.
आज विशेष – भागवत एकादशी.
राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – भरणी १७.३८ पर्यंत नंतर कृत्तिका. चंद्र राशी – मेष १७.३९ पर्यंत नंतर वृषभ.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 22 June 2025
आज तुम्ही फक्त स्वतःच्याच प्रेमात राहाल. आपले जुने छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. आज तुम्हाला इतरांशी जमवून घेणे जरा अवघडच जाईल.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज राशीच्या व्ययात चंद्र असताना काटकसर जमणे शक्यच नाही. आज तुम्ही खर्च कमी करण्यापेक्षा उत्पन्न वाढवायच्या संधी शोधण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्हाला विविध मार्गाने धनप्राप्ती होईल. जिवलग मित्र व आप्तस्वकीय यांच्यासह संध्याकाळ मजेत जाईल. जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट द्याल.
कर्क ( शुभ रंग- लाल)
आज राशीच्या दशमात चंद्र असताना भावनेपेक्षा जास्त कर्तव्याचा विचार करावा लागतो. व्यावसायिक दृष्टीने आज तुम्ही काही अचूक निर्णय घेऊ शकाल.
Adarsh Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा
सिंह ( शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 22 June 2025
उद्योग व्यवसायात फार मोठी रिस्क घेऊ नका. आज व्यवसायाच्या दृष्टीने जरासे विरोधी ग्रहमान आहे. सरकारी नियमांचे पालन काटेकोरपणे करायला हवे.
कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. फसवणूक होऊ शकते. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी नियमांचे बंधन पाळावे.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. महत्त्वाचे करार यशस्वी होतील. पत्नीला अभिमान वाटेल अशी कामगिरी कराल.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. आज तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे. हितचिंतक व हितशत्रू यांच्यातील फरक कळणे अवघड जाईल.
Crime News : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत वारकऱ्यांचे दागिने चोरणारा अटकेत
धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 22 June 2025
आज काहीही करताना तुम्ही फक्त आपल्या मनाचा कौल घ्याल. आज येणाऱ्या काही चांगल्या संधींचा सकारात्मकतेने वापर कराल. छान दिवस आहे.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
प्रॉपर्टी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून आज चांगला फायदा होईल. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी लागेल. आज आईचे मन मोडू नका.
कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास विलंब लागेल. काही चांगल्या संधी हातून निसटतील. आज कार्यालयीन कामासाठी झालेले प्रवास कार्य साधक होतील.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
आज विविध मार्गाने पैसा येईल. पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला लाभ देईल. आज नेत्यांची वक्तव्य जनमानसां वर प्रभाव टाकतील. आज गरजेपुरतेच बोला.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424