मावळ ऑनलाईन – आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमाद्वारे (दि २१) रोजी साजरा करण्यात आला. इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व (Adarsh Vidya Mandir) प्राणायामद्वारे सांगण्यात आले. आपण योगा का करावा, फक्त एका दिवसासाठी योगा न करता दररोज करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी येते,आपला आहार योग्य प्रमाणात घेतला जातो. अशा शब्दांत योगाचे महत्त्व योगा मार्गदर्शक प्रणव पवार यांनी सांगितले.
Pimpri Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्यावतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे
प्राणायाम,ताडासन,तसेच वेगवेगळया आसनांची विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून योगाचे महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांना भ्रामरी प्राणायाम,चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम यांचे प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी आवड निर्माण केली.डोळ्यांचे व्यायाम, सांधे मजबूत राहावे म्हणून ते व्यायाम करून दाखवले. अशा सर्व प्रकारे योगाचे महत्त्व प्रणव पवार यांनी (Adarsh Vidya Mandir) सांगितले.
Pimpri Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्यावतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे
आजच्या गतिमान युगात योगाचे किती महत्त्व आपल्या आयुष्यात आहे, हे त्यांनी अगदी सोप्या आसनांद्वारे विद्यार्थ्यांना करुन दाखवले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष खामकर यांच्या हस्ते योगा मार्गदर्शक प्रणव पवार यांना सन्मानित करण्यात आले. सहशिक्षक किसन पाटील यांनी आभार मानले.शेवटी सर्वांचे मेडीटेशन घेण्यात आले.
मावळ शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी योगदिनानिमित सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष खामकर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या (Adarsh Vidya Mandir) सहकार्याने योगदिन संपन्न झाला.