मावळ ऑनलाईन – इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुना लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी कोसळला, त्यावेळी पुलावर दीडशे ते दोनशे नागरिकांबरोबरच सात दुचाकी गाड्या देखील अडकलेल्या होत्या. हा पूल जुनाट झाल्याने वापरासाठी बंद करण्यात आलेला असतानाही नागरिक व पर्यटकांनी त्याचा सर्रास वापर सुरूच ठेवला होता. त्यामुळेच हा अपघात घडला.
या घटनेनंतर बजरंग दल कुंडमळा शाखेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बचावकार्य संपल्यानंतर आज (बुधवारी) दोरखंडांच्या सहाय्याने त्यांनी कोसळलेल्या पुलावर अडकलेल्या सर्व सात दुचाकी सुरक्षितपणे बाहेर काढल्या. संबंधित दुचाकी गाड्या मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
Talegaon Dabhade : ॲड् पु.वा. परांजपे विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

या मदतकार्यात सागर भेगडे, दत्ता भेगडे, दिलीप गायकवाड, मुन्ना आरशेलू, रामा पडवळ, सुखदेव पडवळ, राठोड दादा, विकास माळी, अजय राठोड, जाधव मामा व आणखी पाच कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे आणखी मोठे नुकसान टळले. स्थानिक नागरिकांनी या कार्यकर्त्यांच्या मदतीचे कौतुक केले आहे.