मावळ ऑनलाईन – शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर एका महिलेने दारू भट्टी (Shirgaon Crime News) लावली. या दारू भट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या कारवाई मध्ये दीड लाखांचे रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (17 जून) दुपारी करण्यात आली.
Alandi : भाविकांकडून माऊलींच्या पालखी व द्वाराकरिता चांदी अर्पण
पोलीस कॉन्स्टेबल गणेश कारोटे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 28 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Talegaon Dabhade : ॲड् पु.वा. परांजपे विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर कारवाई केली. या कारवाई मध्ये दीड लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. तसेच सात हजार रुपये किमतीची 70 लिटर दारू जप्त करण्यात (Shirgaon Crime News) आली.