situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : मावळ तालुक्यातून श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या सर्व दिंड्याचा व वारकऱ्यांचा विशेष सन्मान!

Published On:
Vadgaon Maval
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान, अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री विठ्ठल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातून (Vadgaon Maval) पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या सर्व दिंड्यांना वीणा तसेच अध्यक्ष, विणेकरी व तुळशी वृंदावनधारक महिला यांचा वडगाव मावळ येथे विशेष सन्मान करण्यात आला.

श्री पोटोबा महाराज मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उद्योगपती शंकरराव शेळके, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,राजाराम शिंदे,संतोष कुंभार,मंगल महाराज जगताप, नितीन महाराज काकडे, संतोष महाराज काळोखे,देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे,यावेळी विश्वस्त चंद्रकांत ढोरे, अशोक ढमाले, तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीता कुडे, भास्करराव म्हाळसकर,लिपिक संभाजी येवले,नारायण ढोरे, पंढरीनाथ ढोरे, चंदूकाका ढोरे, विजय जाधव, वारकऱ्यांचे अध्यक्ष मंदार पाटील, दत्तात्रय लालगुडे पाटील आदी उपस्थित होते.


Alandi : अलंकापुरीत लाखो भाविकांची मांदीयाळी

याप्रसंगी तालुक्यातील पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या सर्व दिंड्यांना आमदार सुनील शेळके यांच्या वतीने वीणा देऊन सन्मानित करण्यात आले. दिंड्याचे अध्यक्ष व विणेकरी यांना पोशाख देऊन सन्मान करण्यात आला. देवस्थानच्या विश्वस्त सुनीता कुडे यांच्या वतीने दिंड्यांमधील तुळशी वृंदावनधारक महिलांना साडी, चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी वारकरी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ कीर्तनकार मधुकर महाराज गराडे, आनंद महाराज तळवडे, सदाशिव महाराज विकारी यांचा निष्ठावंत वारकरी म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर, किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट;मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस

माजी राज्यमंत्री भेगडे यांनी पंढरपूरची वारी म्हणजे जगातील सर्वात अद्भुत सोहळा असून, ही वारी व्यसनमुक्त आणि निर्मलवारी झाली पाहिजे, अशी आशा (Vadgaon Maval) व्यक्त केली. बाळासाहेब काशीद म्हणाले देशाच्या यशस्वी वाटचालीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान असून वारकऱ्यांचा पेहरावच स्वच्छतेचे प्रतीक असल्याचा विश्वास व्यक्त केला. भास्करराव म्हाळसकर यांनी ज्ञान, भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या भूमीत आपला जन्म झाला हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख केला.

गणेश ढोरे यांनी देवस्थानच्या माध्यमातून अखंडपणे हा सोहळा सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. सुभाषराव जाधव यांनी स्वागत केले. अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले. गणेश महाराज जांभळे,दत्तात्रय महाराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. किरण भिलारे यांनी देवस्थानच्या कामाची (Vadgaon Maval) माहिती दिली.

Follow Us On