मावळ ऑनलाईन – आंदर मावळातील जि. प. प्राथ शाळा( Takve) टाकवे बु. येथे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळेचा उंबराठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी इ .१ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Alandi : अलंकापुरी वारकरी भाविक भक्तांनी फुलली
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवा प्रसंगी शालेय उपयोगी साहित्य व मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष टाकवे बुद्रुक गावचे सरपंच अविनाश असवले, उपसरपंच प्रिया मालपोटे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले .
Bhat Sheti : सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले; मावळातील भात रोपवाटिका व पेरण्या अडचणीत
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, गणेश काटकर सचिन गायकवाड मुख्याध्यापक अतुल गायकवाड व सर्व सदस्य यांसह ( Takve) पालक व ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते .