मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेत (Kundmala Mishap Update) पाच वर्षाच्या बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवेने अत्यंत वेगाने आणि कार्यक्षमतेने मदतीसाठी धाव घेतली.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे: (Kundmala Mishap Update)
- रोहित माने (वय ३५), रा. उजळायवाडी, कोल्हापूर
- विहान माने (वय ५), रा. उजळायवाडी, कोल्हापूर
- चंद्रकांत साठले (वय ६५), रा. हडपसर, पुणे
पूल कोसळल्याची (Kundmala Mishap Update) माहिती मिळताच १०८ नियंत्रण कक्षाने जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे आणि रोहित ढोमसे यांच्या समन्वयाने तात्काळ ७ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अरुंद रस्त्यामुळे अडथळे येत असतानाही १०८ कर्मचारी १५–२० मिनिटांत दुर्घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे २०–२५ जखमींना तळेगाव जनरल हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल अशा ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले, तर काहींना खाजगी वाहनांमधूनही रुग्णालयात नेण्यात आले.
घटनास्थळी (Kundmala Mishap Update) पाठवण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकांचे बेस लोकेशन्स:
- तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र – MH-14-CL-1136
- वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालय – MH-14-CL-1262
- उर्से टोल प्लाझा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग – MH-14-CL-1207
- कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र – MH-14-CL-1281
- निगडी यमुनानगर प्रसूतिगृह – MH-14-CL-1327
- देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्र – MH-14-CL-1297
- पवननगर काळे कॉलनी ग्रामीण रुग्णालय – MH-14-CL-1270
Pimpri Chichwad Crime News 15 June 2025 : कंपनीतील कामगाराने केली 15.50 लाखांची फसवणूक
१०८ सेवेच्या वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी: (Kundmala Mishap Update)
- डॉ. मशमूम, डॉ. किरण राजपूत, डॉ. स्वप्नील माटकर, डॉ. सुखेंशी हारले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. विजय कदम
- रुग्णवाहिका चालक/पायलट: सूर्यकांत, जयदीप माने, रोहित नाईक, अमोल सुरतवाला, श्रीरंग पाडाळे, अनिल आंद्रे
या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेच्या क्षणीच धैर्याने आणि तत्परतेने रुग्णांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचवले. प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी २४x७ मदत कक्ष सुरू
तहसील कार्यालय मावळ येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत २४x७ मदत कक्ष कार्यरत आहे. नागरिकांनी मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 हेल्पलाइन क्रमांक: ०२११४–२३५४४०