situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभाग रचना प्रक्रिया १७ जूनपासून सुरू

Published On:
Vadgaon Maval
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. येत्या १७ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी ( Vadgaon Maval) दिली.

Lawrence Bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोई समर्थक’ लिहिलेली कार पुण्यात फिरली; व्हिडिओ व्हायरल, पोलिस प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार

राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगरपंचायतीत एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून, १७ प्रभागांसाठी १७ सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी मात्र थेट जनतेतून निवड होणार आहे. प्रस्तावित प्रभाग रचना व आरक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

७ वर्षांनंतर निवडणुकीची तयारी

वडगाव मावळ नगरपंचायतीची मुदत जुलै २०२३ मध्येच संपली होती. मात्र विविध कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. तब्बल सात वर्षांनंतर आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dehugaon: पालखी प्रस्थानाच्या दिवशी विविध मागण्यासाठी एक लाख सह्यांची मोहिम आंदोलन – सुहास गोलांडे

राज्य शासनाने मंगळवारी नगरपंचायतींना प्रभाग रचनेसाठी जनगणना निकष निश्चित करून आदेश दिले. त्यानंतर वडगाव नगरपंचायत सज्ज झाली असून बैठकीद्वारे निवडणूक ( Vadgaon Maval) प्रक्रियेची आखणी सुरू झाली आहे.

प्रभाग रचना प्रक्रियेचा कालावधी

राज्य शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार पुढील टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:

  • ११ ते १६ जून : प्रगणक गटांची आखणी व प्रारूप प्रभाग रचना तयार करणे
  • १७ व १८ जून : जनगणनेच्या माहितीस पडताळणी
  • १९ ते २३ जून : संबंधित क्षेत्रांची स्थळ पाहणी
  • २४ ते ३० जून : गुगल मॅपवर प्रभाग नकाशे तयार करणे
  • १ ते ३ जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी
  • ४ ते ७ जुलै : प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीची स्वाक्षरी
  • ८ ते १० जुलै : मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे

त्यानंतर राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी मसुद्याला मंजुरी देतील. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन त्यानुसार अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल व ती निवडणूक आयोगाकडे पाठवली ( Vadgaon Maval) जाईल.

Follow Us On

Also Read