मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – ज्येष्ठ कृष्ण तृतीया. शनिवार. तारीख – १४.०६.२०२५ (Rashi Bhavishya 14 June 2025). शुभाशुभ विचार – १६ नंतर चांगला दिवस. आज विशेष – संकष्ट चतुर्थी (२१.५७). राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र – उत्तराषाढा २४.२२ पर्यंत नंतर श्रवणचंद्र राशी – मकर.
—————————-
मेष- (शुभ रंग- मेष) Rashi Bhavishya 14 June 2025 आज राशीच्या दशमातून चंद्रग्रहण होत असताना फक्त कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे राहील. मित्रमंडळींना जरा लांबच ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन आज गरजेचा आहे.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी) – शासकीय कामे लांबणीवर पडणार आहेत. नोकरदारांनी कामातील चुका टाळणे हिताचे राहील. आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल.
मिथुन (शुभ रंग – मोरपंखी) – कार्यक्षेत्रातील काही घडामोडी तुम्हाला बेचैन करतील. काही चुकीची माणसे आज संपर्कात येतील. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस असून कोणतेही धाडस करू नको.
कर्क ( शुभ रंग- राखाडी) – व्यवसायात स्पर्धा तीव्र झाल्याचे जाणवेल. आज वेळेचा सदुपयोग व आर्थिक नियोजन गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर तुमचे चांगले सूर जुळतील.
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 14 June 2025 – नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. आज तब्येतही जरा नरमच असेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. कार्यक्षेत्रात हितक्षेत्रूंपासून सावध रहायला हवे.
कन्या (शुभ रंग- हिरवा) – आज नोकरदारांना कामाचा थकवा जाणवेल. काही रसिक मंडळी आज कर्मणुकीस प्राधान्य देतील. मुलांच्या वाढत्या गरजांकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तूळ (शुभ रंग- लाल) – आज तुम्हाला काही घरगुती कामासाठी वेळ काढावाच लागणार आहे. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे आहे. प्रेम प्रकरणे मनस्तापच देणार आहेत.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा) – महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. काही नवीन ओळखी होतील. घराबाहेर वादविवाद टाळावेत. आज मोडण्यापेक्षा थोडेसे वाकणेच हिताचे राहील.
धनु (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 14 June 2025 – आर्थिक आवक मुबलक असेल. आज विरोधकही मैत्रीसाठी हात पुढे करतील. काही नाती आज गोड बोलूनच जपावी लागणार आहेत. शब्द जपून वापरावेत.
मकर (शुभ रंग- क्रीम)आज इतरांच्या भांडणात तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. वैवाहिक जीवनातील लज्जत वाढणार आहे. आज तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) – आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येणार आहे. तरुण मंडळींना मॉल मधील ब्रॅण्डेड वस्तू आकर्षित करतील.
मीन ( शुभ रंग – मरून) – आज दिवस लाभाचा असल्याने वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी तुम्ही उदार मनाने खर्च कराल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424