situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehugaon: पालखी प्रस्थानाच्या दिवशी विविध मागण्यासाठी एक लाख सह्यांची मोहिम आंदोलन – सुहास गोलांडे

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – देहूगाव येथील विविध समस्यां सोडविण्यासाठी पालखी प्रस्थानच्या दिवशी एक लाख सह्यांची मोहिम आंदोलन राबविण्यात येणार असून या विविध समस्या सोडविण्याबाबत मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी देहूगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, की देहूगाव हे तीर्थक्षेत्र असून येथे श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविकांचा राबता असतो. देहूची लोकसंख्या देखील ५० हजारांच्या पुढे गेलेली आहे. मात्र या भाविकांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात व शुध्द पाणी मिळत नाही. येथील रस्ते अद्याप व्यवस्थित नाहीत. तर काही भागात नागरी वस्ती वाढलेली असूनही या भागातील रस्ते नगरपंचायतीने केले नाहीत. काही भागातील अंतर्गत रस्ते केले नाहीत, सरकारी आरोग्य सुविधांची वानवा असल्याचा आरोप करीत या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात.

या बाबत शासनाशी व संबधीत विभागांशी वारंवार पत्रव्यवहार केला असून ही त्याची संबधीतांकडून दखल घेतली जात नाही. नगरपंचायतीला येणारा निधी कशा पध्दतीने होतो याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप केला आहे.

यामध्ये प्रामुख्याने देहू ते देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण करावे, श्री क्षेत्र देहू येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यात यावे, नगरपंचायत बांधणेसाठी राज्यसरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा अपुऱ्या पडत असल्याने या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे, पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व अंतर्गत रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या देहूकरांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी १८ जुनला सकाळी परंडवाल चौकातील संतकृपा मंगल कार्यालयाच्या समोर सकाळी नऊ वाजल्या पासुन हे सह्यांची मोहिम आंदोलन करण्यात येणार आहे.

Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार

हे आंदोलनाची सुरवात गावातील सर्वसामान्य नागरिक व उपस्थि वारकऱ्यांच्या हस्ते सह्या करून करण्यात येणार असल्याची माहिती सुहास गोलांडे यांनी दिली.

Follow Us On

Also Read