मावळ ऑनलाईन – मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ रिक्षा घेऊन आलेल्या एकास दोघांनी बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (11 जून) पहाटे( Vadgaon Maval) घडली.
Pimpri Chichwad Crime News 12 June 2025 : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक
संदीप उल्हास गोडसे (43, वडगाव मावळ) असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम विष्णू शिंदे (45, आंबी मावळ), संजय आम्रता शिंदे (42, वडगाव मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गोडसे हे त्यांचे रिक्षा घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळ गेले. त्यावेळी आरोपी रीक्षातून तिथे आले. त्यांनी रिक्षातून बांबू काढून संदीप यांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तू इथे रिक्षा घेऊन यायचे नाही. धंदा करायचा नाही, असे म्हणत मारहाण केली. महामार्ग पोलीस घटनास्थळी येत असल्याचे पाहून आरोपी पळूनVadgaon Maval) गेले.