Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १४, शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – १०.०६.२०२५ (Rashi Bhavishya 10 June 2025). शुभाशुभ विचार – १२ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – वटपौर्णिमा.(११.३५ नंतर)
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.००.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – अनुराधा १८.०२ पर्यंत नंतर ज्येष्ठा. चंद्र राशी – वृश्चिक.
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 10 June 2025
आज राशीच्या अष्टमात चंद्र असल्याने वाहन चालवताना फक्त ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित करा. कायद्याचे उल्लंघन किंवा कोणतेही गैरवर्तन महागात पडेल.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
एखाद्या विषयावर चर्चा करताना समोरील व्यक्ती आपल्या पेक्षाही ज्ञानी असू शकते याचे भान ठेवा. आज तुम्ही कुठेही आपले मत मांडण्याची घाई करू नका.
मिथुन (शुभ रंग – क्रीम)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटनांना तोंड द्यावे लागेल. आज आरोग्याच्या किरकोळ तक्रारी ही दुर्लक्षित करू नका. दुकानदारांची उधारी वसूल होऊ शकेल.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. एखादा नवीन विषय शिकण्याची इच्छा होईल. आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. छान दिवस.
सिंह ( शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 10 June 2025
बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही हौशी गृहिणी घर सजावटीसाठी महागड्या वस्तूंची खरेदी करतील.
कन्या (शुभ रंग- निळा)
आज झालेल्या काही ओळखी भविष्यात कामी येतील. महत्त्वाच्या कामासाठी काही जवळपास प्रवास होतील. आज भावंडातील सलोखा वाढेल.
तूळ (शुभ रंग- पांढरा)
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुमचे मनोबल उत्तम असेल. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.
वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.
मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताबाबत वेगळाच संशय, गाडीतून पडलेला प्रवासी नेमकं काय म्हणाला?
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 10 June 2025
राशीच्या व्ययस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असताना जमाखर्चाची गणिते चुकणार आहेत. असलेला पैसा जपून वापरा. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी.
मकर (शुभ रंग- लाल)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कार्यक्षेत्र तुम्ही केलेल्या कष्टांची फळे मिळतील. यश दृष्टीक्षेपात येईल. आप्तस्वकीयात तुमचा मान सन्मान वाढेल.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
मोठ्या लोकांमधील असलेली तुमची उठ बस तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.
मीन ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
कोणतीही गोष्ट आज सहज मिळणार नाही तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील. घरात थोरांचे मानपान सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424