situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: चेन-स्नॅचिंगप्रकरणी सराईत गुन्हेगार गजाआड; २.२० लाखांचा ऐवज जप्त

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –शहरातील नांदेड सिटी आणि पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात घडलेल्या चेन-स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लावत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांनी एक सराईत गुन्हेगार गजाआड केला आहे. त्याच्याकडून एकूण २.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यासह दोघा साथीदारांचाही तपास सुरू आहे.

दि. १ मे २०२५ रोजी चैन स्नॅचिंग पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड आणि अंमलदार हे नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चैन-स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या तपासादरम्यान गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित गुन्हा तेजस नितीन वायदंडे (वय २२, रा. चापेकर चौक, चिंचवड गाव, पुणे) या सराईत गुन्हेगाराने केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने त्याचा शोध घेत असताना तेजस वायदंडे वैदवाडी, हडपसर येथे मोटारसायकलसह थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील चेन-स्नॅचिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

तपासात पुढे असे उघड झाले की, तेजस वायदंडे याने चोरलेले मंगळसूत्र त्याचे साथीदार वैभव राजेश कांबळे (वय २७, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) आणि सचिन मल्लिकार्जुन स्वामी (वय २७, रा. नखाते वस्ती, रहाटणी, पिंपरी) यांच्यामार्फत त्याच्या परिचयातील ज्वेलर्सकडे दिले होते. पोलिसांनी तेजस वायदंडेची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक सोन्याची अंगठी सुद्धा सापडली. संबंधित गुन्ह्याची नोंद निगडी पोलीस ठाण्यात आहे.

तेजस वायदंडे हा पूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नोंदवलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून नांदेड सिटी पोलीस ठाणे (गुन्हा रजि. नं. ४९/२०२५) आणि निगडी पोलीस ठाणे (गुन्हा रजि. नं. १३१/२०२५) अशा दोन गुन्ह्यांचा तपास उलगडण्यात पोलिसांना यश आले असून एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

PCMC: ‘अक्षय्य तृतीया’निमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सक्षमा महिला बचत गटाच्या वतीने पारंपरिक पुरणपोळी स्टॉल


Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड

सदर आरोपीस पुढील तपासासाठी नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड तसेच पोलीस अंमलदार नाळे, साळवे, डापसे, राहुल इंगळे, बंटी सासवडकर, तनपुरे, गणेश ढगे, इरफान पठाण, अजित शिंदे, अमित गद्रे, गणेश गोसावी आणि मनोज खरपुडे यांनी संयुक्तरीत्या केली.

Follow Us On