Team MyPuneCity –कोयत्याचा धाक दाखवत एका भंगार व्यवसायिकाकडे दरमहा पाच हजारांची खंडणी मागितली. ही घटना मंगळवारी (दि. २९) (Bhosari)सकाळी दहा वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.
दत्ता बबन खंडागळे (वय 26, रा. विठ्ठल नगर, लांडेवाडी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू विश्वंभर जाधव (वय 32, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी मंगळवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू जाधव यांचा लांडेवाडी भोसरी येथे भंगाराचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते ् आपल्या दुकानात बसले होते.
Maval Online Launching : ‘एआय’च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान – राजीव खांडेकर
Pot ice cream : विद्यार्थी शिकले ‘पॉट आईस्क्रीम ‘ बनवायला
त्यावेळी आरोपी दत्ता खंडागळे हा तेथे आला. तो फिर्यादी यांना म्हणाला की, मला पाच हजार रुपये दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. मी इथला भाई आहे. मला प्रत्येक महिन्याला तू पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने हाताने मारहाण केली. फिर्यादी यांना खाली पाडले. त्यानंतर हातातील कोयता लोकांच्या दिशेने हवेत फिरवून मोठमोठ्याने ओरडून जर कोणी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आला तर त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.