situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रम

Updated On:
---Advertisement---

बंदिशकार डॉ. माधुरी डोंगरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार

Team MyPuneCity – भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून गुरुवार ते शनिवार या कालावधीत सुबद्ध संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार वितरण समारंभ दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून प्रसिद्ध बंदिशकार, शास्त्रीय गायिका व गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांचा पुरस्काराने गौरव केला जणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्कार सोहळ्यानिमित्त डॉ. डोंगरे यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी मंजिरी जोशी संवाद साधणार आहेत. पुरस्काराचे वितरण जीएसटी आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रसंगी पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना पुष्कर महाजन (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.

सुबद्ध संगीत समारोह दि. 1 ते 3 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात दि. 1 रोजी डॉ. राजश्री महाजनी, स्वानंदी सडोलिकर, धनंजय जोशी यांचे, दि. 2 रोजी हर्षद डोंगरे, श्रुती देशपांडे, रवी फडके यांचे तर दि. 3 रोजी शुभदा देशपांडे, शिल्पा आठल्ये, राधिका ताम्हनकर, सावनी गोगटे यांचे गायन होणार आहे. कलाकारांना अभिजित बारटक्के, हृषिकेश जगताप, संजय करंदीकर (तबला), निलय साळवी, अमेय बिचू, अंशुला मोरे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Follow Us On