situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025 : पिंपरी येथे पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

Published On:
Pimpri Chichwad Crime News 05 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना २७ एप्रिल रोजी रात्री शास्त्रीनगर, पिंपरी ( Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025) येथे घडली.

अनिल अमरसिंग यादव (३६, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंड्या ठाकूर, प्रेम यादव, निखिल सरवदे, अभिजित जाधव आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंड्या ठाकूर याने जुन्या भांडणाच्या कारणावरून अनिल यादव यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्याला यादव यांनी विरोध केला असता इतर आरोपींनी यादव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


तळवडे येथे इमारतीला रंग देताना पेंटर गंभीर जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025)

इमारतीला रंग देत असताना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन झालेल्या अपघातात पेंटर गंभीर जखमी झाला. हा अपघात २९ जानेवारी रोजी तळवडे येथे घडला आहे.

दिनेश बाबाराम सोयाम (३८, तळवडे) असे जखमी पेंटरचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी २८ एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वजीर पठाण (४०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हे तळवडे येथे एका इमारतीला रंग देण्याचे काम करत होते. रंग देत असताना त्यांचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. यामध्ये दिनेश यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात कट करावा लागला. तसेच डाव्या हाताची तीन बोटे देखील कट करावी लागली आहेत. कंत्राटदार वजीर पठाण याने दिनेश यांना कोणतीही सुरक्षेची साधने दिली नसल्याने हा अपघात झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Disha Social Foundation : हास्यजत्रेने संकटकाळात सर्वांना आनंद आणि उत्तम आरोग्य दिले – प्रसाद ओक


कासारवाडी येथे आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025)

क्विक एक्स इंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ४३ लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यक्तीला परताव्याच्या नावाखाली १५ लाख रुपये दिले. त्यानंतर परतावा अथवा गुंतवलेली रक्कम न देता २८ लाखांची फसवणूक केली. ही घंटा जून २०२१ ते २ जून २०२२ या कालावधीत कासारवाडी येथे घडली.

याप्रकरणी पीडित व्यक्तीने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हितेंद्र विजय छेडा, विजय छेडा, अशपाक सत्तार शेख, समीर सत्तार शेख (सर्व रा. ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क करून त्यांना क्विक एक्स इंटरप्रायजेस या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला दहा टक्के परतावा मिळेल, असे अमिश दाखवले. आरोपींवर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी ४३ लाख रुपये गुंतवणूक केली. दरम्यान आरोपींनी काही महिने फिर्यादी यांना १५ लाख रुपये परतावा दिला. त्यानंतर रक्कम देणे बंद करून त्यांचे उर्वरित २८ लाख रुपये न देता त्यांची फसवणूक केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.


रावेत येथे मित्राला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025)

दोन मित्रांचे भांडण झाले. एक मित्र रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करतो, असे सांगून रेल्वे ट्रॅकवर गेला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना ३ एप्रिल रोजी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रावेत येथे घडली.

गणेश विठ्ठल लाड (बारामती) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याचे वडील विठ्ठल किसन लाड (५३) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित गणेश गोळे (२५,भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लाड आणि अभिजित गोळे हे मित्र होते. गणेश याच्या मैत्रिणीवरून आणि त्या दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये असलेल्या कॅफेच्या आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. अभिजित हा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा त्याने बनाव केला. तो रावेत येथे आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर गेला. मित्र आत्महत्या करत असल्याने त्याला वाचवण्यासाठी गणेश गेला. अभिजित रेल्वे ट्रॅकवर असल्याने त्याला बाजूला करण्यासाठी गणेश देखील रेल्वे ट्रॅकवरून जात होता. दरम्यान, रेल्वे आल्यानंतर अभिजित अचानक ट्रॅकवरून बाजूला झाला आणि गणेश रेल्वेखाली चिरडला गेला. जखमी गणेश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अभिजित पळून गेला. यामध्ये गणेश याचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Nutan Engineering College : नूतन अभियांत्रिकीमध्ये ” नूतन इन्नोथ्रिव २ के २५ ” प्रकल्प स्पर्धा संपन्न


कंपनीचा डेटा हॅक, डेटा परत करण्यासाठी ६८ लाखांची मागणी ( Pimpri Chinchwad Crime News 29 April 2025)

हिंजवडी येथील एम जे बायोफार्म या कंपनीतील लॅपटॉप हॅक करून डेटा इनस्क्रिप्ट केला. तो डेटा परत करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी कंपनीकडे ६८ लाख रुपयांची मागणी केली आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी घडली आहे.

याप्रकरणी अमितावा दिलीपकुमार पाल (४८, हिंजवडी) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाल हे हिंजवडी येथील एम जे बायोफार्म प्रा ली या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमधील डेल आणि लिनोवा कंपनीचे सर्व्हर अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक करून कंपनीचा डेटा इनस्क्रिप्ट केला. तो डेटा परत देण्यासाठी ८० हजार यूएस डॉलर (भारतीय रुपयांमध्ये ६८ लाख रुपये) ची मागणी केली आहे. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On