situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC: पिंपरी चिंचवड शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचे महिला बचत गटांमार्फत होणार सर्वेक्षण

Published On:
---Advertisement---

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर नियोजनासाठी “पीसीएमसी @५०” उपक्रमांतर्गत लवकरच सर्वेक्षणास सुरुवात होणार

Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. (PCMC)यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचा सर्वेक्षण उपक्रम राबविणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयं सहायता गटातील (SHG) २५० हून अधिक महिला सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी महिला बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पीसीएमसी@५०” शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिनिधित्व सुनिश्चित करत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये महिला बचत गटांमार्फत शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, नोकरदार वर्ग, झोपडपट्ट्यांतील कुटुंबे, गृहसंकुलातील रहिवासी, सामाजिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थाचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारे हे सर्वेक्षण तीन आठवड्यांत पूर्ण होणार आहे.

Maval Online Launching : राजीव खांडेकर यांच्या हस्ते आज Mavalonline.com चा लोकार्पण सोहळा

येत्या काही दिवसांमध्ये महापालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये हा सर्वेक्षण उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १,५०० हितधारकांच्या सहभागासह, फोकस गट चर्चा (FGDs) यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यातून महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद या उपक्रमांमध्ये घेण्यात आली आहे. “पीसीएमसी@५०” या शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरी वाहतूक, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यासाठी आयोजित फोकस गट चर्चा आणि नागरिक सर्वेक्षणातून मिळणारी माहितीच्या आधारावर महापालिकेच्या भावी योजनांचा पाया ठरणार आहे.

Saint Dnyaneshwar Maharaj: संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदीत कार्यक्रम

पीसीएमसी@५०” सर्वेक्षणासाठी महिला बचत गटांना महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ सालापर्यंत ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. यासाठी सोमवार (२८ एप्रिल) रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे टाटा स्ट्राईव्ह व महापालिकेच्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सर्वेक्षकांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हा सर्वेक्षण उपक्रम शहराच्या विकासाचे दीर्घकालीन दिशादर्शन ठरविण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयंसहायता गटांतील (SHG) २५० हून अधिक महिलांचा सहभाग राहणार असून, त्यामुळे स्थानिक महिलांना सक्षम बनवण्यासोबतच सहभागी शहरी नियोजनालाही चालना मिळणार आहे.

या प्रशिक्षण सत्रास माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे व समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिला देखील उपस्थित होत्या.


शाश्वत आणि समृद्ध पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी “पीसीएमसी@५०” उपक्रमांतर्गत महिला बचत गटांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणवेळी नागरिकांना माहिती देऊन महिला सर्वेक्षकांना सहकार्य करावे. नागरिकांनो तुमच्या अपेक्षा व सूचना मनमोकळेपणाने मांडा, जेणेकरून भविष्यातील सक्षम पिंपरी चिंचवड शहररचना आपल्या सामूहिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब ठरेल.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक , पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी चिंचवड शहराचे भविष्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने “पीसीएमसी@५०” उपक्रमांतर्गत शहराच्या विविध घटकामधील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी शहरातील बचत गटांच्या २५० महिलांना सर्वेक्षणांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यातील शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी सर्वेक्षणावेळी महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे.

  • विठ्ठल जोशी, उप आयुक्त , सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Follow Us On