Team MyPuneCity – आळंदी नगरपरिषदेच्या एकूण चार शाळा आहेत. ( Alandi) चार शाळेमध्ये 2150 पटसंख्या आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या गुणांचा सन्मान व्हावा याकरिता आळंदी नगर परिषदेत मार्फत आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा ठराव प्रशासक श्री माधव खांडेकर यांनी घेतला आहे. आदर्श विद्यार्थ्याला रोख रक्कम २५०० तसेच प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेतून पहिले ते पाचवी गटातून एक व सहावी ते सातवी गटातून एक असे प्रत्येक शाळेतून दोन प्रमाणे चार शाळेतून आठ आदर्श विद्यार्थी निवडले जाणार आहेत. आदर्श विद्यार्थी निवडण्याकरिता खालील प्रमाणे घटक विचारात घेण्यात आले आहेत.
Pune News : समृद्ध कलेचा वारसा पुरातन त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणात
- आदर्श विद्यार्थी निवड करिता मुख्याध्यापक यांनी मूल्यमापन करावे याचे आहे. आदर्श विद्यार्थी निवडताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत. आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण पुढील आठवड्यात दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता फ्रुटवाले धर्मशाळा येथे कार्यक्रम आयोजित केला ( Alandi) आहे.
- विद्यार्थ्यांची उपस्थिती
- वर्षभरातील विविध परीक्षांचे गुण
- विद्यार्थ्यांचे चारित्र्य
- विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील सहभाग
- खेळातील प्राविण्य
Special Editorial : मावळच्या मातीला समर्पित… एक नवे पर्व!
शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा , प्रेरणा मिळावी आळंदी नगरपरिषद मार्फत चार शाळांमध्ये एका शिक्षकाचे आदर्श शिक्षक म्हणून निवड केली जाणार आहे. आदर्श शिक्षकाला रोख रक्कम दहा हजार रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनादिवशी ( Alandi) गौरविण्यात येणार आहे. शिक्षकांची शाळेतील उपस्थिती वर्षभरात राबवलेले विविध उपक्रम शिक्षण धोरणाची अंमलबजावणी वर्षभरात शिक्षकांनी घेतलेले प्रशिक्षण शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांच्या आधारे आदर्श शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार (Alandi) आहे.
माधव लक्ष्मण खांडेकर,मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.