Team MyPuneCity –चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी, नेवाळे वस्ती, चिखली येथे नवीन फौजदारी कायद्यांवर विशेष कार्यशाळा संपन्न झाली. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 (BNSS) यासंबंधी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे ॲड. मंगेश खराबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ॲड. मंगेश खराबे यांनी नवीन कायद्यांचे महत्त्व, त्यामधील मुख्य बदल व त्याचा आरोग्यसेवकांवर होणारा परिणाम यावर सखोल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीविषयी, वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी व वाहतूक नियमांचे पालन, तसेच अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
Talegaon Dabhade: फायनान्स कंपनीत गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याचे आमिष; व्यक्तीची १८ लाखांची फसवणूक
उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि नवीन कायद्यांबाबतच्या शंकांचे निरसन केले. आजच्या विद्यार्थ्यांना न्याय, कायदा आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव वाढवणारी कार्यशाळा भविष्यात अधिक व्यापक पद्धतीने आयोजित केली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेमूलक शिक्षणाचे महत्त्व रुजवले जाऊ शकते आणि त्यांना एक जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा मिळेल. अशा कार्यशाळांचा अधिकाधिक आयोजन करून, विद्यार्थ्यांना कायदेशीर साक्षरतेची जाणीव दिली जाऊ शकते, जी त्यांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यास मदत करेल, असे ऍड. मंगेश खराबे यांनी सांगितले.