आळंदी शहरातील पाणीपुरवठा आधिकारी बदला-संदीप नाईकरे
Team MyPuneCity –गेल्या काही महिन्या पासून आळंदी शहरात अनियमित पाणी पुरवठा होत (Alandi)आहे. विभाग रोटेशन नुसार नागरिकांना चार पाच दिवसांनी फक्त दीड तास पाणीपुरवठा होत आहे. तसेच बुधवारी पाईप लाइन दुरुस्ती साठी शहरातील पाणी बंद केला होता. त्या दुरुस्ती नंतर काही भागात रोटेशन विभागा नुसार आठ दिवसांनी पाणी पुरवठा झाला. दुरुस्ती कारणा मुळे पुढील विभागास पाणी पुरवठ्यासाठी विलंब होत आहे.
Alandi News: पाचव्या दिवशी ही आगी मुळे कचरा डेपो परिसरात धुराचे साम्राज्य
या विलंबा मुळे गावठाण खेड विभाग नागरिकांना घरगुती वापरासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही.या पाणी समस्येची तक्रार काही आळंदीकर नागरिकांनी आमदार बाबाजी काळे यांना सांगितली.नागरिकांनी मार्च 2024 वेळापत्रक ,पाण्याचे शहरातील टप्पे आमदार यांना दाखवले.
पहिल्या वेळापत्रक व टप्प्या नुसार पाणीपुरवठा करावा.टप्पे का वाढवण्यात आले.याची चौकशी करा.नागरिकांशी संवाद ठेवून चर्चेतून मार्ग काढा.असा संवाद त्यांचा मोबाईलद्वारे मुख्याधिकारी यांच्याशी झाला.तसेच शहरातील टँकर व्यवस्थे बाबत चर्चा झाली.
Maval Online Launching : राजीव खांडेकर यांच्या हस्ते मंगळवारी Mavalonline.com चा लोकार्पण सोहळा
शहरातील पाणीपुरवठा आधिकारी बदला अशी मागणी संदीप नाईकरे यांनी आमदारांकडे केली. यावेळी योगीराज सातपुते,आशिष गोगावले,अभिजित डफळ हे सर्व उपस्थित होते.नवीन पाणी टप्पे वाढल्यामुळे सर्व पाणी वितरण विस्कळीत झालेले दिसून येत आहे.याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.याबाबत चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.