situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News:प्राधिकरण परिसरात नेपाळी टोळीने गुंगीचे औषध देवून केली १६ लाखांची घरफोडी; दोन आरोपींना अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – प्राधिकरण, निगडी परिसरात(Crime News) कामाला असलेल्या नेपाळी महिलेने साथीदारांच्या मदतीने कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन घरफोडी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Maval News : संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत मावळातील १२८ लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप

निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील प्राधिकरण परिसरात २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या अनामिका नावाच्या नेपाळी महिलेने घरात असलेल्या फिर्यादीच्या मुलगा आणि सून यांना कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून दिले. त्यानंतर इतर साथीदारांना घरात बोलावून घरातील तिजोरी फोडण्यात आली आणि त्यामधून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यात आला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही माहिती मिळवली गेली.

या तपासातून काही दिवसांत कमल बहादुर नयारण शाही (रा. बिरपथ, कमलबाजार ६, जिल्हा अच्छाम, नेपाळ) याला हिंजवडी येथील एका पीजीमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत इतर चार आरोपींची नावे समोर आली, मात्र ते सर्वजण गुन्हा घडल्यानंतर नेपाळमध्ये पसार झाले होते.

सदर आरोपींनी गुन्ह्याआधी बंगलोरमध्ये वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला. आरोपींनी बंगलोर शहरातही अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे समोर आले. नंतर त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडीचा मागोवा घेऊन, पाच महिन्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर दोन आरोपी बंगलोरमध्ये असल्याचे पोलिसांना समजले.

त्यानुसार, पोलिस पथकाने बंगलोर एअरपोर्ट परिसरात स्थानिक पोलिस व CISF च्या मदतीने नवीन बहादुर रुद्र बहादुर शाही (वय २४, रा. राखम नगर पालिका ६, थाना दैलेख, जिल्हा दैलेख, नेपाळ) आणि नर बहादुर दिप बहादुर शाही (वय ३८, रा. कृष्णनगर, भजनी ८, जिल्हा कैलाली, नेपाळ) यांना ताब्यात घेत अटक केली.

तपासादरम्यान त्यांच्याकडून ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. उर्वरित दागिने त्यांच्या साथीदारांनी नेपाळमध्ये विकल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या आरोपींनी भारतात येऊन मोठ्या शहरांमध्ये श्रीमंत कुटुंबांमध्ये घरकाम करून विश्वास संपादन करणे, नंतर संधी साधून जेवण अथवा पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन चोरी करणे किंवा घरफोडी करणे आणि त्यानंतर नेपाळमध्ये पळून जाणे, असा गुन्हे करण्याचा प्रकार राबवला आहे. काही काळानंतर हे आरोपी भारतात परत येऊन अन्य शहरांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे करतात.

या आरोपींकडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

निगडी पोलीस स्टेशन: गुन्हा क्र. ५५६/२०२४ (पिंपरी चिंचवड)

महालक्ष्मीपुरम पोलीस स्टेशन: गुन्हा क्र. २६२/२०२३ (बंगलोर, कर्नाटक)

बायपनहल्ली पोलीस स्टेशन: गुन्हा क्र. २१७/२०२४ (बंगलोर, कर्नाटक)

चिमेनी पोलीस स्टेशन: गुन्हा क्र. ८४/२०२५ (कासारगोड जिल्हा, केरळ)

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील स.पो.नि. अंबरिष देशमुख, पोउपनि प्रतिक भिंगारदिवे, पोहवा भगवान नागरगोजे, स्वप्नील पाचपांडे, दत्ता शिंदे, सिंद्राम बाबा, शिवाजी नागरगोजे, सुधाकर अवताडे, राहुल गायकवाड, पोशि विनायक मराठे, दीपक पिसे, केशव चेपटे, प्रवीण बांबळे, सुनील पवार आणि मपोहवा नूतन कोंडे यांनी मोलाचे योगदान दिले.

Follow Us On