Team MyPuneCity –आळंदी नगरपरिषद हद्दीतील(Alandi News) साखरे महाराज जवळील पुलावर नव्याने करण्यात आलेली पाईप लाईनला मुख्य लाईन चा जॉईंट देण्याचे काम आज दि. २५ रोजी पूर्ण झाले.
ते काम पूर्ण झाल्या नंतर पाण्याची सराव चाचणी होऊन आळंदी शहरास पाणीपुरवठा होणार होता. दि. २३ पासून अंदाजे दीड दिवस संपूर्ण आळंदी नगरपरिषदेस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. सदरचे दुरुस्तीचे काम काही तांत्रिक कारणाने लांबले आहे.
यामुळे पाणीपुरवठा वितरित करण्यास पालिकेला विलंब झाला. आज आठव्या दिवशी पद्मावती रोड परिसरात पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा झाला.तेथील काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याचा फोटो व व्हिडिओस सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
आठ दिवसांनी पाणी भेटून सुद्धा ते अशुध्द पाणी भेटल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
https://youtu.be/AwU80BMOQnY?si=owtRwWj8S0jqSBxU