Team MyPuneCity –मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने आळंदी तालुका खेड येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार 27 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता ज्ञानसागर मंगल कार्यलय वडगांव रोड,आळंदी देवाची येथे होणार आहे.हा मेळावा नेहमीप्रमाणे मोफत असून 98 वा मेळावा आहे.
Vasant Lecture Series : ‘मला भेटलेली माणसे’ विषयावर डॉ . नितीन आरेकरांनी श्रोत्यांशी साधला संवाद
तरी जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन बबनराव कुऱ्हाडे, डी.डी भोसले पाटील, संजय घुंडरे यांनी केले.
या मेळाव्यासाठी येताना वधू- वरांनी स्वतः आधार कार्ड झेरॉक्स , बायोडाटा घेऊन पालकांसह मेळाव्यास यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 9822026442 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, त्यांचे लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही.म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत 97 यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत 4500 पेक्षा जास्त लग्न जमून पार पडलेले आहेत. त्यापैकी 653 लग्न हे विधवा,विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत.धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली जगदंब फाउंडेशन अंतर्गत हे मोफत मेळावे घेतले जातात.
Pune Crime News:हडपसरमध्ये अपघात करून पसार झालेल्या टँकर चालकाला अटक
मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने आळंदी तालुका खेड येथे मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, सेवानिवृत्त वनाधिकारी प्रभाकर कड पाटील, मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अशोक कुटे यांनी दिली.