Team MyPuneCity – युनिक एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड प्रशाला सेंटर येथील प्रशिक्षण(Solar PV Course) केंद्रात प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन हेल्पर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
हा उपक्रम यूएसडीसी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि युनिक एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स यांच्यामार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये मा. कमल सक्सेना आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून आम्हांला प्रशिक्षणा दरम्यान खुप मोठे सहकार्य मिळाले. प्रशिक्षणाचा उद्देश युवकांना ग्रीन एनर्जी क्षेत्रातील रोजगारक्षम कौशल्यांनी सक्षम करणे हा होता.
Emitec Technologies India : तळेगावच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन
या प्रशिक्षणात एकूण 60 युवकांनी सहभाग घेतला होता. सर्वांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत प्रमाणपत्र प्राप्त केले.
Cyber Crime News : सायबर गुन्हयासाठी बैंक अकाऊंट घेण्यासाठी दुबईतून भारतात आलेल्या आरोपीस सायबर पोलिसांकडून अटक
या उपक्रमावेळी यूएसडीसीचे संचालक बाळासाहेब झरेकर,विजय कुलकर्णी, हुसेन हाजीते ,शाखा प्रमुख स्नेहल शेट्टी, अकॅडमीक हेड सुगंधा टेकाळे, यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
प्रशिक्षक कैलास राणे व ओमकार डिकोंडा हे उपस्थित होते. प्रशिक्षणार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यात ग्रीन एनर्जी क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करावे, असे उद्गार उपस्थित प्रमुखांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाच्या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व प्रशिक्षक, समन्वयक, व उपस्थित पाहुण्यांचे विशेष आभार मानण्यात आले. हा समारंभ प्रशिक्षणार्थ्यांसाठी नव्या भवितव्याची आशा घेऊन आलेला उत्सव ठरला.