situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025 : पिंपळे निलख येथे बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

Published On:
Crime 1
---Advertisement---

Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (24 एप्रिल) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास विशाल नगर पिंपळे निलख येथे करण्यात ( Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025)आली.

नीलकंठ कोमलनायक राठोड (38, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल मोघे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांना एक दुचाकी संशयितरित्या जात असताना दिसली. पोलिसांनी दुचाकी अडवून तपासणी केली असता दुसाकीवर 9 हजार 570 रुपये किमतीची दारू आढळून आली. आरोपी नीलकंठ हा बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करताना आढळून आला.


बनावट शूज विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025)

पुमा से कंपनीच्या नावाचा आणि चिन्हाचा वापर करून बनावट शूज आणि चप्पल विक्री केल्याप्रकरणी पिंपरी मधील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (24 एप्रिल) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास दयाराम अँड सन्स या दुकानात करण्यात आली.

नितीन रमेश नथराणी (33, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश दशरथ मोरे (48, कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुमा से कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या नावाचा आणि चिन्हाचा बनावट शूज आणि चपलांवर वापर करून आरोपीने त्याची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोरे यांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी कारवाई करत सात लाख 59 हजार रुपये किमतीच्या शूज आणि चपला जप्त केल्या आहेत.


रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई ( Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025)

रावेत पोलिसांनी रावेत फूड पार्क जवळ सुरू असलेल्या एका हुक्का पार्लर वर कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (23 एप्रिल) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अरविंद रमेश राठोड (30, रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश ब्राह्मण यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत फूड पार्क शेजारी एका पत्रा शेडमध्ये आरोपीने ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रावेत पोलिसांनी कारवाई करत तीन हजार दोनशे रुपये किमतीचे हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवर जप्त केले.


विद्यार्थी घेण्यासाठी बस थांबविल्याने पीएमपी बस चालकाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025)

बौद्धिक अक्षम मुलांना बस मध्ये घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बस थांबवली असता दोघांनी पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (24 एप्रिल) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील कामायनी विद्यामंदिर समोर घडली.

सतीश दत्तू राठोड (36, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक पाटील, स्वराज विनायक पाटील (21, निगडी, प्राधिकरण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे पी एम पी बस चालक आहेत. राठोड आणि महिला कर्मचारी हे निगडी प्राधिकरण येथील बौद्धिक अक्षम मुलांसाठीची कामायनी विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेले. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला थांबवली असता आरोपी विनायक याने राठोड यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्याच्या मुलगा स्वराज यांनी देखील राठोड यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


पिंपरी येथे विनाकारण दगडाने मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 25 April 2025)

रस्त्याने घरी जात असलेल्या व्यक्तीला अडवून विनाकारण दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (23 एप्रिल) दुपारी दोन वाजताच्या सुमारास विठ्ठल नगर पिंपरी येथे घडली.

शरद सिताराम पारखे (42, विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारखे त्यांचे नातेवाईक भीमराव खटके यांच्यासोबत विठ्ठल नगर पिंपरी येथे बोलत थांबले होते. त्यांना बोलून घरी जात असताना आरोपीने पारखे यांना अडवले. पारखे यांनी घरी जाण्यासाठी रस्ता द्या असे म्हटले असता आरोपीने त्यांना दगडाने मारून जखमी केले.

Follow Us On