Team MyPuneCity – सायबर गुन्ह्यासाठी भारतातून बँक अकाउंट घेऊन ते दुबई येथून चालवले जात असल्याचा प्रकार ( Cyber Crime News ) पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सायबर गुन्ह्यासाठी बँक अकाउंट घेण्यासाठी दुबईतून भारतात आलेल्या आरोपीसह दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात 66 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, एका व्यक्तीला इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट ( Cyber Crime News ) फाउंडेशन (IYDF) नावाच्या एका गैर-सरकारी संस्थे (NGO) ची माहीती देवुन त्यांचे “Wealth On Go” नावाचे अॅप्लिकेशन च्या प्लॅटफॉर्मवरुन मॅच्युरिटीचे फिक्स इन्कम प्रोडक्ट, इक्विटी प्रोडक्ट, हायब्रीड असेट, बॉन्ड इ. इत्यादीमध्ये गुंतवणूक करून दररोज १ टक्का परतावा कमविण्याचे अमीष दाखवुन सुरुवातीला थोडा परतावा देऊन विश्वास संपादन केला व त्यानंतर वेगवेगळ्या बैंक अकाऊंटमध्ये एकुण ६६ लाख ६३ हजार ३१९ रुपये भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली. याबाबत पिंपरी चिंचवड सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पोलीस अंमलदार दिपक माने हे फिर्यादी यांचे फसवणुक झालेल्या पैश्याचे ट्रान्झेक्शन संदर्भात तपास करीत असतांना त्यांना कोटक बँकेच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सपर झाले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर कोटक बैंक अकाऊंट धारकाची माहीती घेतली असता सदरचे बैंक अकाउंट न्यु महालक्ष्मी पाईप फिटींग या नावाने अमित सुनिलकुमार केसवाणी (रा. कोल्हापुर) या व्यक्तीच्या नावाने असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्यानंतर उपनिरीक्षक वैभव पाटील यांचे पथक कोल्हापुर येथे रवाना करण्यात आले.
पथकाने तांत्रिक तपास करुन अकाऊंट धारक अमित सुनिलकुमार केसवाणी ( Cyber Crime News ) याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने सदरचे बैंक अकाऊंट हे कमल भजन तेजवाणी ( कोल्हापुर) याला दिले असल्याचे सांगीतले. त्यावरुन कमल भजन तेजवाणी याचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडे तपास केला असता त्याने अमित केसवाणी याच्याकडुन घेतलेले कोटक बैंक अकाऊंट व इतर २० बैंक अकाउंट हे नरेंद्र शिशराम सिंग (सध्या रा. दुबई) याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडुन पैसे घेतले असल्याचे सांगीतले.
त्यानंतर सहायक निरीक्षक प्रविण स्वामी व उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी कौशल्यपुर्वक तपास केला असता नरेंद्र शिशराम सिंग हा दोन दिवसापुर्वीच भारतामध्ये कोल्हापुर येथे आल्याची माहीती मिळाली. त्यानंतर कोल्हापुर येथिल वेगवेगळ्या ५० बॅरेक मध्ये त्याचा शोध घेतला ( Cyber Crime News ) असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता तो भारतामधील व्यक्तींचे बैंक अकाऊंट काढायला लावुन ते अकाऊंट दुबई येथे चालवित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तो पाहीजे आरोपी विकि, संदिप व सुनिल, यांच्या सोबत गुन्हा करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरुन कमल भजन तेजवाणी व नरेंद्र शिशराम सिंग याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील फसवणुकीच्या रकमेबाबत व आरोपी यांनी भारतातील किती बँक अकाऊंट दुबई येथे नेऊन चालवले याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, विदया पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार दिपक माने, हेमंत खरात, स्वप्निल खणसे, अतुल लोखंडे, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, संतोष सपकाळ, विशाल निचित, परशुराम चव्हाण, दिपाली चव्हाण, जयश्री पाटील, ईश्वरी अंबरे ( Cyber Crime News ) यांनी केली.