situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 24 April 2025 : मेदनकरवाडी येथे ड्रग्स विक्री प्रकरणी तरुणास अटक

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (२३ एप्रिल) रात्री मेदनकरवाडी येथे करण्यात आली.

तुषार मलीभाऊ कड (३०, वाकी बुद्रुक, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे एकजण स्कॉर्पिओ कार घेऊन एमडी ड्रग्स विक्रीसाठी आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तुषार कड याला ताब्यात घेतले. त्याच्या कार मधून ७० हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी ड्रग्स सह आठ लाख रुपये किमतीची कार देखील जप्त करत तुषार याला अटक केली.


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट मॅचवर सट्टा; गुंडा विरोधी पथकाकडून सहा जणांना अटक

आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन माध्यमातून सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (२२ एप्रिल) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ब्ल्यू रिज सोसायटी, हिंजवडी येथे करण्यात आली.

अंकुश यशवंत कुशवाह (२५), विक्रम ललित झा (२५), विकास गोविंद पारधी (२४), आयुष कुमार झा (२६), गौरव शिवराम ठेंगरी (२६, रा. हिंजवडी), प्रेमकुमार ईश्वरदास राजवाणी (५२, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आयपीएल सिझन सुरु आहे. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर हिंजवडी येथील ब्ल्यू रिज सोसायटी मधील फ्लॅट नंबर ९०४ मध्ये ऑनलाईन माध्यमातून सट्टा घेतला जात होता. याबाबत माहिती मिळाली असता क्रिकेट मॅच सुरु असतानाच पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच पाच जणांना सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडे दुसऱ्यांच्या नावांवर रजिस्टर असलेले सिमकार्ड आढळून आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


जागेच्या वादातून एकास मारहाण, आरोपीला अटक

जागेच्या वादातून जागा मालकाला बाहेर बोलावून घेत मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी पुनावळे येथे घडली.

रोहिदास आनंदा बोरगे (५६, जांभे, मुळशी) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्हारी सोपान बोरगे (४३, पुनावळे, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्हारी याने रोहिदास यांना फोन करून पुनावळे येथे बोलावून घेतले. पुनावळे येथे असलेल्या जागेवर तू यायचे नाही, असे म्हणत मल्हारी याने रोहिदास यांना सिमेंट ब्लॉकने मारहाण करून जखमी केले.


आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात कोटींची फसवणूक

एका व्यक्तीला त्याच्या वरिष्ठांच्या नावाने व्हाट्स अप मेसेज आणि ईमेल करून पैसे पाठवण्यास भाग पाडले. यामध्ये व्यक्तीची तब्बल सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात घडली.

याप्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार +49 1636814985, +33 7578121507 हे क्रमांक धारक आणि 9550880238736200481 हा अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्टीफन ईटर आणि ख्रिस्तोफ बेरगॉट या नावाने स्वतःला सीईओ आणि केपीएमजी कायदे सल्लागार असल्याचे भासवून फिर्यादी यांना व्हाट्स अप मेसेज व ईमेल केले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कंपनीला विदेशात गुंतवणूक करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून सात लाख ३८ हजार ५८८ युरो (भारतीय चलनात सात कोटी १६ लाख ४३ हजार ३६ रुपये) पाठवण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.


विनाकारण मारहाण, तिघांवर गुन्हा

मोशी येथे तिघांनी मिळून एका व्यक्तीला विनाकारण मारहाण केली. ही घटना मंगळवारी (२२ एप्रिल) रात्री नऊ वाजता घडली.

मनोज संजय जगताप (४४, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक बाळासाहेब मळेकर (२८), तेजस लांबतुरे (२१), हर्षल आव्हाडे (२०, सर्व रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना विनाकारण मारहाण केली. प्रतीक मळेकर याने फिर्यादी यांना ‘तुमचा येण्याजाण्याचा रस्ता बंद करतो. रस्ता माझ्या मालकीचा आहे, असे म्हणत आरोपींनी मनोज यांना मारहाण केली. दगडाने डोक्यात मारून दुखापत केली.


बावधन येथे गॅस पेमेंट करण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून व्यक्तीला एक लिंक पाठवण्यात आली. त्याआधारे बँकेची माहिती घेत व्यक्तीच्या खात्यातून दोन लाख रुपये काढून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना २९ मार्च रोजी बावधन येथे घडली.

याप्रकरणी पीडित व्यक्तीने २३ एप्रिल रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9040433853मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. आरोपीने तो एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचे गॅसचे पेमेंट ऑनलाईन करा, असे सांगत आरोपीने फिर्यादी यांना एक लिंक पाठवली. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहिती घेत त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.


चिखली येथे खातेदाराच्या परस्पर एफडीवर काढले पाच लाखांचे कर्ज

खातेदाराच्या परस्पर त्याच्या एफडी रकमेला मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने पाच लाख रुपयांचे कर्ज काढले. ही कर्जाची रक्कम खातेदाराच्या खात्यातून परस्पर इतर खात्यावर ट्रान्सफर करत पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ५ जुलै २०२४ रोजी पूर्णानगर, चिखली येथे घडली. मात्र हा प्रकार एप्रिल २०२५ मध्ये उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. ही कर्जाची रक्कम फिर्यादी यांच्या बँक खात्यावर आली असता आरोपीने ती रक्कम इतर खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादीस काहीही कल्पना नव्हती. एप्रिल २०२५ मध्ये बँकेशी संपर्क केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On