Team MyPuneCity – तेजज्ञान फाऊंडेशन (TGF) निर्मित तेजग्रंथ रथाचे आगमन सोमवारी सकाळी ७.३० वाजता पिंपळे सौदागर ( Tejgyan Foundation) येथील जगताप डेअरी सेंटर (साई चौक) येथे उत्साही वातावरणात झाले. या प्रसंगी पवार कुटुंबीय, जोंधळे सर, वर्षा भोंडे, पाटणकर कुटुंब, गावंडे कुटुंब आणि भगत मॅडम आदी तेजभक्तांनी उपस्थित राहून रथाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या तेजग्रंथ रथामध्ये तेजगुरू तेजपारखीजी तथा सरश्री लिखित विविध विषयांवरील ३०० हून अधिक पुस्तकांचे दर्शन घडवण्यात आले. या पुस्तकांचे उद्दिष्ट आत्मोन्नती, सकारात्मक विचारसरणी आणि अध्यात्मिक उन्नतीस प्रेरणा देणे असे आहे.

संपूर्ण दिवसभर हा तेजग्रंथ रथ पिंपळे सौदागर परिसरातील कोकणे चौक, रहाटणी आणि साई चौक परिसरात फिरत राहिला. स्थानिक नागरिकांच्या सेवा आणि मार्गदर्शनासाठी तो सहज उपलब्ध होता. एकूण 15 तेजसेवकांनी या अभिव्यक्ती सेवेत आपला सहभाग देऊन रथसेवेला ( Tejgyan Foundation) भक्कम पाठिंबा दिला.
या दिवशी अनेक नागरिकांनी तेजग्रंथ रथाला भेट दिली आणि विविध पुस्तकांची खरेदी केली. विविध वयोगटातील वाचकांनी या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही वाचकांनी या रथाच्या पुन्हा आगमनाची मागणीही केली, जेणेकरून ते अधिकाधिक पुस्तकांची खरेदी करू ( Tejgyan Foundation) शकतील.
तेजज्ञान फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक विचारसरणीचा प्रसार होण्यास हातभार लागत असून, ही अभिव्यक्ती सेवा भविष्यातही पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा नागरिकांनी ( Tejgyan Foundation) व्यक्त केली आहे.