Team MyPuneCity – पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांची (Terrorist Attack Death) पार्थिवं गुरुवारी पहाटे पुण्यात पोहोचली. आज काही क्षणांतच वैकुंठ स्मशानभूमीत दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण पुणे शोकसागरात बुडालं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack Death) २६ जणांचा मृत्यू झाला, त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा आणि पुण्यातील दोन तरुणांचा समावेश आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघंही निसर्गप्रेमी होते. एकत्र फिरायला गेलेले हे दोघं… आता अखेरच्या प्रवासासाठीही एकत्रच निघाले आहेत.
Pahalgam terrorist attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध; मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
आज सकाळी साडेचारच्या सुमारास दोघांची पार्थिवं पुणे विमानतळावर दाखल झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, क्रीडामंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Maval News : मावळमधील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत संपन्न
शोकाकुल कुटुंबीय, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यास सज्ज आहेत. पुणे शहर दोघांच्या आठवणींनी भारावलेलं आहे. “एकत्र जगलो, एकत्र गेलो” म्हणत त्यांचा हा अंतिम प्रवास शहरातील प्रत्येकाच्या हृदयात जिवंत राहील.