Team MyPuneCity –पुणे शहरातील गॅस पाइपलाईन, मलवाहिन्या, रस्ते क्रॉकटिकरण अशा विविध विकासकामांसाठी होणाऱ्या खोदकामांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर ( Pune News) वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पूर्वी सर्व खोदकामे पूर्ण करून संबंधित रस्त्यांचे योग्य पद्धतीने पृष्ठभाग दुरुस्त (surfacing) करावे.
या सूचनेनुसार, वाहतूक शाखेतील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील चालू असलेल्या सर्व खोदकामांची तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदारांना लेखी नोटीस देण्याचे निर्देश आहेत. या नोटीसीत कामे वेळेत पूर्ण न केल्यास आणि त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले ( Pune News) आहे.
वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, फक्त ‘रस्त्याचे काम चालू’ या कारणावरून जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत १२ वेळा गंभीर वाहतूक कोंडी झाल्याचे आढळून आले. याशिवाय, शहरातील ५० हून अधिक ठिकाणी अपुऱ्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली ( Pune News) आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन प्रवासाच्या सुलभतेचा विचार करता, ३१ मे पूर्वी खोदकामे पूर्ण करणे व रस्त्यांची योग्य दुरुस्ती करणे हे अनिवार्य असल्याचे वाहतूक शाखेने ( Pune News) अधोरेखित केले आहे.