situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune News : मोठ्या सहकारी बँकांनी छोट्या बँकांना मदतीचा हात द्यावा – मुरलीधर मोहोळ

Published On:
Pune News
---Advertisement---

Team MyPuneCity – मोठ्या सहकारी बँकांनी लहान बँकांना ( Pune News) मदतीचा हात द्यावा, याकरिता केंद्र सरकारच्या मदतीने सहकारी बँकांसाठी स्वतंत्र अम्ब्रेला ऑर्गनायझेशन (राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ) स्थापन करण्यात आली आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा छोट्या सहकारी बँकांनी करुन घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत (व्हॅम्निकॉम) आज झालेल्या प्रमुख सहकारी बँकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, सीईओ प्रभात चतुर्वेदी, सहकार आयुक्त दीपक तावरे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे आणि सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या बैठकीत सहकारी बँकांना येणार्‍या अडीअडचणी प्रामुख्याने मांडण्यात आल्या. ज्या सहकारी बँकांना भांडवलाची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत, त्यांना भांडवलाचा पूरवठा करणे, कायदेविषयक सल्ला देणे, बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य, येणारा खर्च यासाठी तजवीज करणे, याबरोबरच बँकांना लागणारे मनुष्यबळ, बँकिंगमधील अनुभवी अधिकार्‍यांची गरज अशा विविध मुद्यांवर बँकांनी आपले मुद्दे मांडले व सूचना केल्या. याशिवाय पीएमसी बँकेमुळे झालेल्या सहकार चळवळीच्या बदनामीची देखील चर्चा करण्यात आली. तर नॉन-शेड्यूल्ड सहकारी बँकांना देखील सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याची गरज उपस्थितांनी बोलून दाखवली. यावेळी पुणे जनता सहकारी बँक, टीजेएसबी, विश्‍वेश्‍वर बँक, डोंबिवली नागरी बँक, कल्याण जनता बँक, पंढरपूर अर्बन बँक, पुणे पिपल्स बँक, बारामती सहकारी बँक, पुणे सहकारी बँक, ओमप्रकाश देवडा पिपल्स बँक, सारस्वत बँक, पिंपरी-चिंचवड सहकारी बँक आदी बँकांचे प्रमुख पदाधिकारी ( Pune News) उपस्थित होते.

शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शहरी समुदायांसाठी सक्षम आर्थिक पर्यावरण निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन करण्यात आलेले अम्ब्रेला ऑर्गनायझेशन देशभरातील शहरी सहकारी बँकांना एकत्र आणणारे केंद्रीय संघटन म्हणून कार्य करते आहे, असे ज्योतिंद्रभाई मेहता यावेळी म्हणाले. या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे आणि शाश्‍वत वाढीसाठी सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दीष्ट ( Pune News) आहे.

Follow Us On