situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : उंच इमारतींची उभारणी हे डिझाईन पेक्षाही पर्यावरणीय आव्हान

Updated On:
---Advertisement---


नियोजन तज्ज्ञ, शहर नियोजक, अभियंते, आर्किटेक्ट आणि या क्षेत्रातील धोरणकर्त्यांचे स्पष्ट मत

Team MyPuneCity – वेगाने विकसित होत असलेले ( Pune ) पुणे नजीकच्या भविष्यात मुंबईप्रमाणेच आपली क्षितिजे विस्तारायला सज्ज झाले असून येत्या काळात इमारतींची वाढणारी उंची हे डिझाईन पेक्षाही एक पर्यावरणीय आव्हान म्हणून समोर येणार असल्याचे मत नियोजन तज्ज्ञ, शहर नियोजक, अभियंते, वास्तुविशारद आणि या क्षेत्रातील धोरणकर्त्यांनी मांडले. १५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यासाठी आणि त्यात राहण्यासाठी खरोखर काय आवश्यक आहे आणि या वाढणाऱ्या उंच इमारतींसाठी आपण किती तयार आहोत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

निमित्त होते फोरम ऑफ क्रिटिकल युटिलिटी सर्व्हिसेस अर्थात फोकस या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राईज ऑफ द हाय राईज’ या चर्चासत्राचे. नगर रस्त्यावरील हयात रेसिडेन्सी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यासोबतच मुंबईमधील स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, वास्तुविशारद, सर्व्हिस कन्सल्टंट्स, कॉन्ट्रॅक्टर्स, लिफ्ट मॅन्युफॅक्चरर्स आणि टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्ससह बांधकाम आणि पर्यावरण क्षेत्रातील १२० हून अधिक व्यावसायिकांनी यामध्ये सहभाग घेतला.

Vasant Lecture Series : व्यक्तीला कौतुकाची थाप गरजेची असते – मधुराणी गोखले प्रभुलकर

यावेळी फोकस संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष रखेजा, फोकसचे उपाध्यक्ष वास्तुविशारद संदीप शिक्रे, फोकसच्या पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष व श्रॉफ ग्रुपचे संस्थापक जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष अरविंद जैन, फोकस पुणे विभागाच्या अध्यक्षा आणि सस्टेन अँड सेव्ह संस्थेच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा प्रणती मुनोत आणि पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला आदी चर्चासत्रात सहभागी झाले होते. दोन्ही शहरांमधील लोकांनी यावेळी आपली मते मांडत सर्वसमावेश चर्चा ( Pune ) केली.

Indian Air Force: भारतीय वायुदलाचा ‘डेजर्ट फ्लॅग-१०’ युद्धसरावात सहभाग ; युएईमध्ये बहुराष्ट्रीय लढाऊ सरावाला प्रारंभ

यावेळी कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञांनी उंच इमारतींचा होत असलेला उदय हे विचारपूर्वक नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतली उभी झेप असल्याचे सांगत दुसरीकडे यामुळे वर्तणुकीचे आणि पर्यावरणीय आव्हान आपल्या समोर उभे ठाकल्याचे नमूद केले.

देशाच्या विविध भागातून आलेल्या बांधकाम उद्योगातील अनेकांनी कुशल व्यावसायिक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांसह यावेळी चर्चा केल्या. याबरोबरच पुण्याचे शांत, आरामदायी शहर ते चैतन्यशील, गतिमान आणि आता उंच इमारतींचे, उभ्या शहरीकरणात रूपांतर झालेले शहर अशा प्रवासावर देखील सांगोपांग चर्चा केली.

यावेळी बोलताना वास्तुविशारद मिलिंद चंगानी म्हणाले, “१५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींसाठी मोठा खर्च येतो, जो ७० मीटरच्या मानकांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. परंतु याची किंमत मात्र आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही. संरचनात्मक अखंडता, आगीपासून संरक्षण, जीवन सुरक्षा, कचरा व पाणी व्यवस्था यासोबतच रहिवाशांची मानसिक तयारी या सर्व आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. हे होत असताना तांत्रिक उपायांवर चर्चा करण्याची आज नेमकी गरज आहे.”

आयओटी, बीआयएम (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग), डिस्ट्रीक्ट कुलिंग सिस्टिम्स, ड्रोन आणि अगदी दर्शनी भागांवरील सौर पॅनेल हे भविष्यातील सक्षम तंत्रज्ञान म्हणून समोर येत असताना ड्रोन, एआय, बीआयएम, आयओटी आणि प्रेडिक्टिव डेटा ॲनालिटिक्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण हे देखील केंद्रस्थानी आहे. या सर्व माहितीचा वापर उंच इमारती आणि सार्वजनिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यास, बीआयएम सारख्या तंत्रज्ञानाचा बांधकाम खर्च हा २०% पर्यंत कमी होऊ शकतो, असे यावेळी चिराग डेढिया ( Pune ) यांनी सांगितले.

उंच इमारती या आपल्या राहणीमानात आणि संवादात देखील बदल घडवून आणतात. आपल्याला केवळ तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकांना यासाठी तयार करण्याची गरज असल्याचे मत अरविंद जैन यांनी व्यक्त केले. यामध्ये रहिवाशांना प्रशिक्षण देण्यापासून ते चांगल्या सार्वजनिक वाहतूक व कनेक्टिव्हिटीसाठी डिझाईइन करण्यापर्यंत सर्व काही समाविष्ट असल्याचे त्यांनी ( Pune ) सांगितले.

चंगानी यावेळी पुढे म्हणाले, “चीनमध्ये ३,२०० च्या तुलनेत भारतात फक्त २०० उंच इमारती असून यापैकी बहुतेक मुंबईत आहेत. उभ्या दिशेने जाण्यामध्ये आता पुण्याचा क्रमांक लागणार आहे. मात्र इमारतींची उंची वाढताना खऱ्या अर्थाने खोलवर विचार करणे गरजेचे आहे.”

या चर्चासत्रा दरम्यान फोकस आणि विविध अभियांत्रिकी, पदव्युत्तर संस्थांमध्ये सामंजस्य करारांच्या मालिकेवर देखील स्वाक्षरी करण्यात आल्या. यामुळे या संस्थांना फोकसच्या उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यावसायिक सदस्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असून यासोबतच याद्वारे विद्यार्थ्यांसाठी वास्तविक जीवनातील कौशल्य विकासाच्या संधीही खुल्या होतील.

सस्टेन अँड सेव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कार्बन फूटप्रिंटचे मोजमाप देखील घेण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी केएसबी, केओएनई, मॅग्नस व्हेंचर्स, लीप इन्फो सिस्टिम्स, यलो स्काई आणि सस्टेन अँड सेव्ह यांचे विशेष सहकार्य लाभले होते. प्रणती श्रॉफ मुनोत यांनी सर्व सहभागी तज्ज्ञ आणि वक्त्यांचे आभार ( Pune ) मानले.

Follow Us On