situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025 : ऍसिड पिऊन विवाहितेची आत्महत्या

Published On:
Pimpri Chichwad Crime News 05 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – बाथरूम मधील ऍसिड पिऊन विवाहितेने ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025) आत्महत्या केली. पतीच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना 15 एप्रिल रोजी चाकण मधील पानसरे मळा येथे घडली. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय आनंदा मदने (26, पानसरे मळा, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुली सोबत आरोपी अक्षय मदने याचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह झाला होता. आरोपी अक्षय याने वेगवेगळ्या कारणावरून फिर्यादी यांच्या मुलीसोबत भांडण केले. तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने 15 एप्रिल रोजी बाथरूम मधील ऍसिड पिऊन आत्महत्या केली.


चिखली येथे बँकेने सील केलेल्या मालमत्तेवर ताबा ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025)

बँकेने सील केलेल्या एका दुकानामध्ये दोघांनी मिळून अनधिकृतपणे ताबा घेतला. बँकेने लावलेले सील आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. ही घटना 9 एप्रिल रोजी पूर्णानगर चिखली येथे उघडकीस आली.

याप्रकरणी बँक ऑफ बडोदा भिवरी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत केशव बोराडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण दत्तात्रय कोकाटे (50, मोरेवस्ती, चिखली) आणि महिला (42) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण कोकाटे याचे पूर्णानगर चिखली येथे शांतीसदन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये एक दुकान आहे. त्यासाठी त्याने बँक ऑफ बडोदा भिवरी शाखेतून कर्ज घेतले होते. कर्जाची वेळेवर परतफेड न केल्याने बँकेने कारवाई केली. बँकेकडून दुकानाला सील करण्यात आले. बँकेची कारवाई झालेली असताना देखील आरोपींनी सील आणि कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत दुकानाचा ताबा घेतला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.


मोशी येथे रिक्षाच्या धडकेत सात वर्षीय मुलगी जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025)

मोशी येथील भारत माता चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाने सात वर्षीय मुलीला धडक दिली. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात 20 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला.

जखमी मुलीच्या 32 वर्षीय आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 14/केयू 1598) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भारत माता चौकातील बेकरी मध्ये गेली होती. बेकरी मधून सामान घेऊन घरी येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाने तिला धडक दिली. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतर रिक्षा चालक पळून गेला.


मारुंजी येथे टँकरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025)

फर्निचर दुकानातील साहित्य आणण्यासाठी जात असलेल्या चुकीला टँकरने धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (21 एप्रिल) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मारुंजी गाव येथील अल्हाट कॉलेजच्या जवळ घडला.

अनस खान (26, नेरे दत्तवाडी, मुळशी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर नसीम अन्वर अन्सारी (45) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अन्सारी शहाबाद हयात (27) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर (एमएच 46/एफ 8577) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांचे नेरे दत्तवाडी येथे सोफा गोडाऊन आहे. त्यामध्ये नसीम अन्सारी आणि अनस खान हे काम करत होते. ते दोघेजण फिर्यादी यांची दुचाकी घेऊन दुकानाचे मटेरियल आणण्यासाठी वाकड येथे जात होते. मारुंजी गावातील अल्हाट कॉलेज जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक दिली. या अपघातात नसीम अन्सारी हे जखमी झाले. तर अनस खान याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


पिंपरी येथे विनाकारण तरुणास मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025)

पिंपरी येथे तरुणाला विनाकारण मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (21 एप्रिल) मिलिंदनगर येथे घडली.

केतन गौतम सोनवणे (26, मिलिंदनगर पिंपरी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश पुजारी उर्फ कंपा (३०, मिलिंदनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश हा फिर्यादि केतन यांच्या बिल्डिंग खाली आला. तिथे केतन थांबले होते. काही कारण नसताना आकाश याने केतन यांना बेदम मारहाण केली आणि पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


वाकड ब्रीज येथे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून उकळले 70 हजार रुपये ( Pimpri Chinchwad Crime News 22 April 2025)

जनावरांची वाहतूक करणारी चार वाहने अडवून त्याच्याकडे जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना विचारत, धमकी देऊन 69 हजार 999 रुपये जबरदस्तीने ऑनलाइन माध्यमातून घेतले. ही घटना 8 एप्रिल रोजी मुंबई बंगलोर महामार्गावर वाकड ब्रीज येथे घडली.

याप्रकरणी अस्लम नूरमोहम्मद शहा (43, मुंबई) यांनी 21 एप्रिल रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित उर्फ लव शामसुंदर सहानी, सुभाष भीमराव शिंदे, शंकर काशीनाथ सोनवणे आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहा आणि त्यांच्यासोबत अन्य तीन टेम्पो मध्ये म्हशी भरून ते गोवंडी मुंबई येथे जात होते. 8 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई बंगलोर महामार्गावर वाकड ब्रीज येथे पहाटेच्या वेळी आरोपींनी चार टेम्पो अडवले. शहा आणि त्यांच्यासोबतच्या इतर चालकांकडे जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना विचारत आरोपींनी टेम्पो आणि म्हशी जमा करण्याची धमकी दिली. शहा यांना हाताने मारहाण करून टेम्पो आणि म्हशी सोडविण्यासाठी शहा यांच्याकडून 69 हजार 999 रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत

Follow Us On