मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. आजचा दिवस – सोमवार. तारीख – २१.०४.२०२५ (Rashi Bhavishya 21 April 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- कालाष्टमी.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- उत्तराशाढा १२.३७ पर्यंत नंतर श्रवण.
चंद्र राशी – मकर.
—————————-
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी ) Rashi Bhavishya 21 April 2025
कार्यक्षेत्रात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. पूर्वी घेतलेल्या कष्टांचे फळ मिळेल. आज तुम्ही घरातील थोरांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ १०० % मिळणार आहे. गुढ शास्त्राच्या अभ्यासकांना आज साधनेची प्रचिती येईल.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात आपल्या क्षमतेच्या बाहेर आर्थिक जोखीम घेऊ नका. जे कळत नाही त्यात जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्या. संध्याकाळी वाहन जपून चालवा.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
अति आक्रमकता टाळा. वाद-विवाद टाळून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कोणतेही निर्णय घेताना आज जोडीदाराला विश्वासात घेणे हिताचे राहील.
River cleanliness campaign: नदी स्वच्छतेचा एल्गार;मुळा नदीपात्रात पर्यावरण प्रेमींचा ठिय्या
सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 21 April 2025
उद्योग व्यवसायात ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होत असताना प्रकृतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. तुम्हाला विश्रांतीही गरजेची आहे. येणी असतील तर वसूल होतील.
कन्या (शुभ रंग- हिरवा)
आज तुमच्यासाठी आनंदी व उत्साही दिवस आहे. तुम्ही आपले आवडते छंद जपण्याचा प्रयत्न कराल. प्रिय मित्रांच्या सहवासात तुमच्या आठवणी ताज्या कराल.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. आज संध्याकाळी तुम्ही सहकुटुंब चैन कराल.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.
Crime News: मावळ तालुक्यात दोन ठिकाणी अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी
धनु (शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 21 April 2025
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वाद विवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपण्यासाठी कठोर शब्दप्रयोग टाळावेत.
मकर (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज उत्साही दिवस आहे.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात जमाखर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोला.
मीन (शुभ रंग- राखाडी)
धंद्यात येणे अनपेक्षित पणे वसूल होईल. मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. आज दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसेच होईल, त्यामुळे शुभच चिंता.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424