पीडित मुलगी आपल्या घरून शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत अडवले आणि “तुला चॉकलेट व खाऊ देतो” असे सांगून कृष्णा फ्लोअर मिल (पिठाची गिरणी) येथे नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार (Breaking News) करण्याचा प्रयत्न केला.
Ornelas High School: ऑर्नेलास हायस्कुलच्या १९७५ च्या तुकडीची ५० वर्षानंतर पुन्हा वाजली घंटा
माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी गिरणी कामगाराला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. ती दररोज त्याच रस्त्याने शाळेत जात होती, याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार (Breaking News) केला.
Express Way Bus Fire : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बस जळून खाक, सुदैवाने बचावले सर्व प्रवासी
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
या घटनेमुळे वाघोली परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाघोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायदा (POCSO Act) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजल सोनवणे करत आहेत.