मावळात ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तळेगाव दाभाडे येथील युवानेते (Talegaon Yuve Sena) रितेश वाघमारे आणि किरण राऊत यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, युवासेना शिवसेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे तसेच अमित कुंभार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.