MyPuneCity – जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा येथील बॅटरी हिल परिसरात अवजड ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दहा वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (20 एप्रिल) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडला.
Maval Wild Life : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी मावळात ३६ पाणवठ्यांची सुविधा
निलेश संजय लगड (वय 40), श्राव्य निलेश लगड (वय 10, दोघे रा. शुक्रवार पेठ पुणे) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
जुना पुणे मुंबई महामार्गावरील बॅटरी हिल येथे रविवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या ट्रक (जीजे 03/बीटी 6701) चा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ट्रॅक समोरील जाणारी इनोवा कारला (एमएच 19/बीजी 8067) पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर अलिबाग कडून पुणे कडे जाणारी ईरटीका कारला (एमएच 12/युसी 2800) जोरदार धडक देऊन फरफटत नेले. त्यानंतर समोरून येणाऱ्या टाटा पंच (एचआर 36/एपी 9250) या कारला धडक देऊन ट्रक पुणे बाजूकडील संरक्षण कठड्याला जाऊन आदळला. या अपघातात ईरटीका कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर कार मधील 12 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणावळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.